राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डमार्फत (National Bank for Agriculture and Rural Development - NABARD) ग्रामीण नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नुकताच 'RSVC-AMRIT' प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांच्या हस्ते 'RSVC-AMRIT (RuTAGe Smart Village Centre AMRIT)' प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.
  • ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण बळकट करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे.
  • सदर प्लॅटफॉर्म हा 'नाबार्ड' आणि 'प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय' (Office of the Principal Scientific Adviser - OPSA) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आला आहे.
  • नाबार्डचे अध्यक्ष डॉ. शाजी कृष्णन व्ही. तसेच इतर विविध संस्था प्रतिनिधी या उद्घाटन समारंभास उपस्थित होते.

'RSVC-AMRIT' प्लॅटफॉर्मची ठळक वैशिष्ट्ये:

  • 'RuTAGe स्मार्ट व्हिलेज सेंटर' (RSVC) परिसंस्थेचा डिजिटल कणा म्हणून RSVC-AMRIT हा काम करतो.
  • याद्वारे तंत्रज्ञान शोध, पडताळणी, अंमलबजावणी मागोवा, आणि देखरेख या बाबी शक्य आहेत.
  • हा प्लॅटफॉर्म तळागाळातील स्तरावर तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढण्यास चालना देईल अशी अपेक्षा आहे.

NABARD बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): NABARD म्हणजेच National Bank for Agriculture and Rural Development अर्थात 'राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक' होय.
  • स्थापना वर्ष: बी. शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार, नाबार्ड कायदा, १९८१ अंतर्गत १२ जुलै १९८२ रोजी NABARD ची स्थापना करण्यात आली होती.
  • वैशिष्ट्य: कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अर्थपुरवठा करणे या मुख्य उद्देशाने प्रेरित अशी भारतातील सर्वोच्च विकास-वित्तीय संस्था आहे.
  • मुख्यालयाचे ठिकाण:  मुंबई येथे NABARD चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या डॉ. शाजी कृष्णन व्ही. (शाजी के.व्ही.) हे NABARD च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.