'इंटरनॅशनल वर्कप्लेस ग्रुप(International Workplace Group)' च्या 'कोठूनही काम निर्देशांक (Work From Anywhere Index)' २०२६ मध्ये मुंबईचा ७७ गुणांसह समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- जागतिक दर्जाच्या 'दूरस्थ काम (Remote work)'आणि 'वर्ककेशन(workcation)' यांसाठी आकर्षक असलेल्या शहरांच्या यादीत स्थान मिळवणारे मुंबई हे एकमेव भारतीय शहर ठरले आहे.
- या निर्देशांक यादीत मुंबईचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- प्रवासासोबतच 'रिमोट वर्क' करणाऱ्या व्यावसायिकांसाठी योग्य असलेल्या ठिकाणांचे मूल्यांकन करणाऱ्या या जागतिक क्रमवारीत समाविष्ट झालेले हे एकमेव भारतीय शहर आहे.
- मुंबईला एकूण ७७ गुण मिळाले असून हे लंडन आणि मियामीसारख्या जगप्रसिद्ध शहरांच्या गुणांपेक्षा अधिक आहेत ही जमेची बाजू आहे.
- वाहतूकीची उत्तम व्यवस्था, राहण्याची छान सोय तसेच लवचिक कार्यस्थळांची उपलब्धता हे घटक या यशात मोलाची भूमिका बजावतात.
'वर्क फ्रॉम एनीव्हेअर इंडेक्स २०२६' मधील अव्वल क्रमवारी शहरे:
- १. बँकॉक (१०६.५ गुण)
- २. टोकियो
- ३. बार्सिलोना
- ४. पोर्टो
- ५. व्हँकुव्हर