नुकताच मोझांबिकच्या राजकारणी, मानवतावादी आणि महिला हक्क कार्यकर्त्या ग्रासा माशेल यांना २०२५ चा 'इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (Indira Gandhi Peace Prize)' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- ग्रासा माशेल यांना 'इंदिरा गांधी शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार (Indira Gandhi Prize for Peace, Disarmament, and Development) २०२५' ने सन्मानित करण्यात आले.
- सदर पुरस्कार हा 'इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट (Indira Gandhi Memorial Trust)' च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
- भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १०९ वी जयंतीचे औचित्य साधून सदर पुरस्कार सोहळा नवी दिल्लीतील जवाहर भवन येथे पार पडला.
इंदिरा गांधी शांतता पुरस्कार - महत्वपूर्ण माहिती:
- हा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून तो माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ १९८५ मध्ये 'इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट' द्वारे सुरू करण्यात आला होता.
- जागतिक शांतता, नि:शस्त्रीकरण, विकास तसेच मानवी कल्याणासाठी दिलेल्या योगदानाची हा पुरस्कार दखल घेण्याचे कार्य करतो.
- १९८६ मध्ये पहिला 'इंदिरा गांधी शांतता पुरस्कार' हा 'पार्लमेंटेरियन्स फॉर ग्लोबल ॲक्शन (Parliamentarians for Global Action - PGA)' या संस्थेला देण्यात आला होता.
- पुरस्कारामध्ये १ कोटी रुपयांची रोख रक्कम, एक ट्रॉफी आणि मानपत्र यांचा समावेश आहे.
- पुरस्कार विजेत्यांची निवड ही एका आंतरराष्ट्रीय ज्युरीद्वारे करण्यात येते ज्याचे अध्यक्ष भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन हे आहेत.