सुप्रसिद्ध पतमानांकन संस्था (Credit ratings agency) 'मूडीज रेटिंग्ज'मार्फत नुकताच आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या वास्तविक जीडीपी (GDP) वाढीचा अंदाज ६% वरून ७% पर्यंत वाढविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय अर्थव्यवस्थेची पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक धक्क्यांचा सामना करण्याची क्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
- या संस्थेने भारताचे 'Baa3' रेटिंग आणि 'स्थिर' दृष्टिकोन कायम ठेवला आहे.
- आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत (Q1) भारताचा जीडीपी ७.८% ने आणि कॅलेंडर वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत ८.२% ने वाढला.
- कॅलेंडर वर्ष २०२५ मध्ये ही वाढ ७.३% इतकी होती. यावरून आर्थिक गती वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येते.
- आर्थिक वर्ष २०२७ मध्ये महागाईचा दर ४.८% राहण्याचा अंदाज आहे जो आर्थिक वर्ष २०२६ मधील २.४% च्या तुलनेत अधिक आहे.