कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच देशभरातील विविध उच्च न्यायालयांमध्ये ८ न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत (Ministry of Law and Justice - MoL&J) देशभरातील विविध उच्च न्यायालयांमधील ८ न्यायाधीशांच्या मुख्य न्यायाधीश (Chief Justices - CJ) पदाच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममार्फत अर्थात न्यायाधीशांच्या निवड समितीमार्फत नावांची शिफारस करण्यात आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी आणि कायदा व न्याय मंत्रालयाकडून औपचारिक अधिसूचना जारी केली जाते.
  • या समग्र प्रक्रियेमुळे संस्थात्मक नियंत्रण तसेच समतोल राखण्याचा हेतू साध्य होतो.
  • भारतीय संविधानाच्या कलम २१७ अन्वये या नियुक्त्या घटनात्मक तरतूदीनुसार करण्यात येतात.
  • राष्ट्रपतींना घटनात्मक प्राधिकरणांशी अनिवार्य सल्लामसलत केल्यानंतर उच्च न्यायालयांचे न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याचा अधिकार या कलमामुळे प्राप्त होतो.

नियुक्त झालेले उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (नाव - उच्च न्यायालय):

  • महेश चंद्र त्रिपाठी - बॉम्बे 
  • अल्पेश यशवंत कोगजे - मध्य प्रदेश 
  • रवींद्र व्ही. घुगे - कलकत्ता 
  • संजय कुमार अग्रवाल - राजस्थान 
  • व्ही. कामेश्वर राव - पटना 
  • अश्वनी कुमार मिश्रा - पंजाब आणि हरियाणा 
  • पुष्पेंद्र सिंग भाटी - जम्मू-काश्मीर आणि लडाख
  • कृष्ण राम मोहपात्रा - छत्तीसगड