कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत नुकतीच ३ उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १२४ (२) अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या या नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे.
- गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग हे या यादीत समाविष्ट आहेत.
इतर महत्त्वाच्या नियुक्त्यांबाबत माहिती:
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायिक अधिकारी गुरविंदर पाल सिंग यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.
३ उच्च न्यायालयांचे प्रभारी मुख्य न्यायाधीश:
- न्यायाधीश न्यायमूर्ती पुथिचिरा (पी.) सॅम कोशी - तेलंगणा उच्च न्यायालय
- न्यायाधीश न्यायमूर्ती मानस रंजन पाठक - गुजरात उच्च न्यायालय
- न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन वासुदेव सांब्रे - दिल्ली उच्च न्यायालय