केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी १०-वर्षीय जागतिक धोरणासाठी ‘रक्षा’ (RAKSHA) हे संरक्षण मुत्सद्देगिरीचे (Defence Diplomacy) आराखडा-दस्तऐवज जारी केले आहेत.

ठळक मुद्दे:

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे संरक्षण मुत्सद्देगिरीविषयक ‘रक्षा’ (RAKSHA) हा दस्तऐवज जारी केला आहे.
  • पुढील १० वर्षांत संरक्षण संबंध बळकट करण्याबाबत यामध्ये भारताच्या दृष्टिकोनाची रूपरेषा मांडण्यात आली आहे.
  • भारतीय लष्कराचे प्रमुख धीरज सेठ, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

‘रक्षा’ (RAKSHA) संरक्षण आराखड्याची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • सहकार्य आणि निर्यातीला संरक्षण मुत्सद्देगिरीमुळे चालना मिळते.
  • द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संरक्षण संबंध दृढ करणे, भारताला एक विश्वासार्ह जागतिक सुरक्षा भागीदार म्हणून प्रस्थापित करणे तसेच संरक्षण क्षेत्रातील सहकार्य व तंत्रज्ञान देवाणघेवाणीद्वारे परस्पर विकासाला चालना देणे यासाठी हा आराखडा महत्वाचा ठरतो.
  • धोरणात्मक भागीदारी, क्षमता बांधणी, स्वदेशी उत्पादनांची निर्यात आणि सागरी सुरक्षा यांवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.