नुकतेच संस्कृती मंत्रालयामार्फत भारतीय वारशासाठी 'संस्कृती (Sanskriti)' नावाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आधारित अर्थपूर्ण शोध प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • संस्कृती मंत्रालयाचे सचिव श्री. विवेक अग्रवाल यांनी 'संस्कृती (Sanskriti)' नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित संवादात्मक सहाय्यकचे (Conversational Assistant) अनावरण करण्यात आले आहे.
  • सदर प्लॅटफॉर्म मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट (culture.gov.in) वर उपलब्ध असून याद्वारे भारतीय सांस्कृतिक वारशाबद्दलची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी मिळवता येणार आहे.
  • सदर प्लॅटफॉर्म मंत्रालय तसेच त्याच्याशी संबंधित संस्थांच्या सुमारे ६५ डिजिटल पोर्टलवरील माहिती एकत्रित करण्याचे कार्य करते.
  • भारत सरकारच्या 'भाषिणी (BHASHINI - BHASHa INterface for India)' प्लॅटफॉर्मच्या मदतीने वापरकर्ते २२ भारतीय भाषांमध्ये माहिती मिळवू शकतात ही एक महत्वपूर्ण अशी जमेची बाजू आहे.