नुकतेच मर्सिडीजच्या इटालियन ड्रायव्हर किमी अँटोनेलीने 'युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स (United States Grand Prix)' २०२६ जिकतानाच आपला नववा विजय नोंदविला आहे.

ठळक मुद्दे:

  • अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथील 'सर्किट ऑफ द अमेरिकाज' येथे ही फॉर्म्युला वन (F1) शर्यत आयोजित करण्यात आली होती.
  • या विजयामुळे अँटोनेली आपल्या पहिल्या F1 वर्ल्ड चॅम्पियनशिप किताब मिळवण्याच्या आणखी जवळ पोहोचला आहे.
  • ही F1 युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्सची ४७ वी आवृत्ती होती जी २०२६ F1 वर्ल्ड चॅम्पियनशिपची १८ वी फेरी ठरली आहे.
  • २०२६ च्या हंगामातील मर्सिडीजचा हा १० वा विजय ठरला आहे.