नुकतेच आशियाई क्रिकेट परिषदेच्या (Asian Cricket Council - ACC) पुरुष १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत ९ वे जेतेपद पटकवत विक्रम प्रस्थापित केला आहे.

ठळक मुद्दे:

  • ही यंदाची २०२६ सालची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) १९ वर्षांखालील आशिया कपची १३ वी आवृत्ती संपन्न झाली आहे.
  • ओमानमधील मस्कत येथील अल अमरात क्रिकेट ग्राउंड (ओमान क्रिकेट अकॅडमी ग्राउंड) येथे ही स्पर्धा ५ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खेळवण्यात आली आहे.
  • यामध्ये १९ वर्षांखालील एकूण ८ संघांनी (भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिराती (UAE), नेपाळ आणि मलेशिया) सहभाग घेतला होता.
  • अंतिम सामन्यात भारताने गतविजेत्या पाकिस्तानचा एका विकेटने पराभव स्पर्धेचे जेतेपद आपल्या नावावर केले.

भारताचा उल्लेखनीय विक्रम:

  • भारताने १९ वर्षांखालील आशिया कपमध्ये सर्वाधिक ९ वेळा (१९८९, २००३, २०१२ - संयुक्त विजेतेपद, २०१३-१४, २०१६, २०१८, २०१९, २०२१ आणि २०२६) विजेतेपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.

वैयक्तिक पुरस्कार:

  • सामनावीर (Player of the Match): मोहित उल्वा
  • मालिकावीर (Player of the Tournament): आर्यवीर सेहवाग (५ डाव - ३६१ धावा; १ शतक आणि ३ अर्धशतके)