नुकतेच ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडियामार्फत (Film Federation of India - FFI)' एकूण ३३ प्रविष्टींमधून (Entries) ९९ व्या अकादमी पुरस्कार ऑस्कर २०२७ साठी 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म (Best International Feature Film)' या श्रेणीसाठी 'गोंधळ' या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून निवड करण्यात आली आहे.
  • या बहुमानासह ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रविष्टी म्हणून निवडला जाणारा ‘गोंधळ’ हा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे.

‘गोंधळ’ चित्रपटाबाबत थोडक्यात महत्वपूर्ण माहिती:

दिग्दर्शन आणि महत्व:

  • ‘गोंधळ’ हा संतोष दावखर लिखित आणि दिग्दर्शित मराठी भाषेतील एक 'मानसिक आणि सांस्कृतिक थरारपट (Psychological and cultural thriller)' स्वरूपाचा चित्रपट आहे.
  • ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित असणारा हा चित्रपट धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा तसेच मानवी संवेदना यांचे चित्रण करण्याचे काम करतो.

चित्रपट कलाकार:

  • इशिता देशमुख (मुख्य भूमिका)
  • किशोर कदम
  • योगेश सोहनी
  • निषाद भोईर
  • अनुज प्रभू
  • ध्रु ठोके

पुरस्कार:

  • संतोष दावखर यांनी ५६ व्या 'IFFI - International Film Festival of India' २०२५ मध्ये 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' म्हणून 'सिल्व्हर पीकॉक (Silver Peacock)' पुरस्कार जिंकला होता.
  • १७ व्या 'बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' २०२६ मध्ये ‘गोंधळ’ चित्रपटाला 'फिप्रेस्की (FIPRESCI)' पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर नामांकित मराठी चित्रपट:

  • गोंधळ (२०२७)
  • कोर्ट (२०१५)
  • हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
  • श्वास (२००५)