नुकतेच महेश काकडे हे गणितासाठीचा रामानुजन पुरस्कार जिंकणारे पाचवे भारतीय ठरले आहेत.
ठळक मुद्दे:
- 'बीजगणितीय संख्या सिद्धांतातील (Algebraic number theory)' उत्कृष्ट कार्यासाठी भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc) बेंगळुरू, कर्नाटक येथील प्राध्यापक महेश काकडे यांची 'विकसनशील देशांमधील तरुण गणितज्ञांसाठीचा रामानुजन पुरस्कार (Ramanujan Prize for Young Mathematicians from Developing Countries) २०२६' चे विजेते म्हणून निवड करण्यात आली.
भारतीय विजेत्यांची यादी:
- सुजाता रामदोराई (२००६)
- अमलेंदू कृष्ण (२०१५)
- रितब्रत मुन्शी (२०१८)
- नीना गुप्ता (२०२१)
- महेश काकडे (२०२६)
तरुण गणितज्ञांसाठीच्या रामानुजन पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती:
- प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावे असलेला हा पुरस्कार २००५ सालापासून दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
- विकसनशील देशातील संशोधक ज्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असून ज्यांनी विकसनशील देशात कठीण परिस्थितीत काम करत असताना गणिताच्या क्षेत्रात असाधारण संशोधन केले आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो.
- सदर पुरस्कार हा 'अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिओरेटिकल फिजिक्स (Abdus Salam International Centre for Theoretical Physics - ICTP)' आणि 'इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल युनियन' (International Mathematical Union - IMU) यांच्यामार्फत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या 'विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा'च्या सहकार्याने संयुक्तपणे प्रदान करण्यात येतो.
- पुरस्कार विजेत्याला १०,००० अमेरिकन डॉलर्सचे रोख बक्षीस देण्यात येते.