नुकताच महाराष्ट्रातील लोणार सरोवराचा ‘आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक विज्ञान संघाच्या (International Union of Geological Sciences - IUGS)' च्या ‘तिसऱ्या १०० (Third 100)’ जागतिक भूगर्भीय वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले ‘उल्कापातामुळे निर्माण झालेले विवर (Lonar Lake Impact Crater)' याचा समावेश IUGS च्या ‘तिसऱ्या १०० भूगर्भीय वारसा स्थळांच्या’ (Third 100 Geological Heritage Sites) यादीत करण्यात आला आहे असे केंद्रीय खणन मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आले.
- सदर निवडीद्वारे या स्थळाचे असाधारण भूगर्भीय तसेच वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
- पोर्तुगालमधील अल्गार्वे प्रांतातील लोउले (Loulé) येथे आयोजित IUGS जिओहेरिटेज कार्यक्रमात ही यादी जाहीर करण्यात आली होती.