नुकतेच मॅग्नस कार्लसनने सलग दुसऱ्या वर्षी 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस'चे विजेतेपद (Esports World Cup Chess Title) पटकावले आहे.

ठळक मुद्दे:

  • नॉर्वेचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याने पॅरिस, फ्रान्स येथे पार पडलेल्या 'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस' स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळवले आहे.
  • सदर स्पर्धा ११ ते १५ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडली.
  • कार्लसनने अंतिम फेरीत बेलारूसचा ग्रँडमास्टर डेनिस लाझाविक याचा पराभव केला.
  • या स्पर्धेत हिकारू नाकामुरा तिसऱ्या तर अलीरेझा फिरोझा चौथ्या स्थानावर विराजमान राहिला.

'ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप चेस २०२६' बद्दल थोडक्यात माहिती:

  • ही एक जागतिक ई-स्पोर्ट्स बुद्धिबळ स्पर्धा आहे.
  • यामध्ये अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑनलाइन आणि प्रत्यक्ष यांचा मेळ असलेल्या स्पर्धात्मक स्वरूपात भाग घेतात.
  • २०२५ मध्ये सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या पहिल्या आवृत्तीनंतरची ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती.