नुकतीच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत (Ministry of Youth Affairs and Sports - MYAS) 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार (Tenzing Norgay National Adventure Awards) २०२४' च्या ४ विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- साहस खेळांसाठीचा भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार असलेल्या 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार २०२४' च्या ४ विजेत्यांची घोषणा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने केली आहे.
- 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' सोबतच २०२४ चे सदर पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे अधिकृतपणे प्रदान केले जातील.
TNNAA २०२४ बद्दल थोडक्यात माहिती:
पुरस्कार स्वरूप आणि रोख रक्कम:
- युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानुसार प्रत्येक विजेत्याला पुरस्कारस्वरूप कांस्य मूर्ती, प्रमाणपत्र, रेशमी टायसह ब्लेझर किंवा साडी तसेच १५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.
समाविष्ट श्रेण्या:
जमीन, पाणी आणि हवेतील साहसी उपक्रमांचा यामध्ये समावेश असतो. खालील श्रेणी यामध्ये समाविष्ट आहेत.
- भू-साहस
- जल-साहस
- हवाई-साहस
- जीवनगौरव
TNNAA २०२४ चे विजेते:
- बलजीत कौर आणि स्कलझांग रिग्झिन (भू-साहस)
- रिमो साहा (जल-साहस)
- शिव प्रसाद चमोली (जीवनगौरव)