नुकतीच गृह मंत्रालयामार्फत १९९५ बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी डॉ. सज्जन सिंग यादव यांची जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • डॉ. सज्जन सिंग यादव हे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे आहेत. 
  • १९८९ बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या अटल डुलू यांची जागा डॉ. यादव हे घेतील.

डॉ. सज्जन सिंग यादव यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • डॉ. यादव यांनी व्यय विभाग, पोषण अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव प्रशासनामध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे.

भूषविलेली पदे:

  • मुख्य कार्यकारी अधिकारी - दिल्ली जल बोर्ड
  • आयुक्त - पूर्व दिल्ली महानगरपालिका
  • अन्न व पुरवठा आयुक्त तसेच मूल्यवर्धित कर (VAT), उत्पादन शुल्क (Excise) आणि लक्झरी टॅक्स आयुक्त - दिल्ली
  • अतिरिक्त मुख्य सचिव - उद्योग
  • अध्यक्षपद (अतिरिक्त कार्यभार) - दिल्ली राज्य औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ (DSIIDC)

डॉ. यादव यांची पुस्तके:

  • 'स्केलिंग माउंट यूपीएससी: इन्स्पायरिंग स्टोरीज ऑफ यंग आयएएस ऑफिसर्स(Scaling Mount UPSC: Inspiring Stories of Young IAS Officers)'
  • 'इंडियाज व्हॅक्सिन ग्रोथ स्टोरी: फ्रॉम काउपॉक्स टू व्हॅक्सिन मैत्री (India’s Vaccine Growth Story: From Cowpox to Vaccine Maitri)'

प्राप्त सन्मान/ पुरस्कार:

  • 'नॅशनल अवॉर्ड फॉर ई-गव्हर्नन्स (National Award for e-Governance) २०१७-१८' - नागरिक-केंद्रित सेवा वितरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल