कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे (Ministry of Corporate Affairs - MCA) नवी दिल्ली येथे आयोजित 'PMIS उद्योग क्षेत्र पुरस्कार (PMIS Industry Awards)' २०२६ मध्ये 'महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra)' ला सर्वोत्कृष्ट विजेता म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Corporate Affairs - MCA) पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत (Prime Minister Internship Scheme - PMIS) भागीदार कंपन्यांना सन्मानित करण्यासाठी नवी दिल्ली येथे 'PMIS उद्योग क्षेत्र पुरस्कार २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते.
- यामध्ये 'महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला' सर्वोत्कृष्ट उद्योग विजेता म्हणून गौरविण्यात आले आहे.
- सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान MCA च्या सचिव डॉ. पल्लवी जैन गोविल यांनी भूषवले.
- या सोहळ्यास मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
PMIS उद्योग क्षेत्र पुरस्कार २०२६ बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- सदर पुरस्कार इंटर्नशिपची निर्मिती, व्यवस्थापन, नावीन्य तसेच मनुष्यबळ विकासातील योगदानातील उत्कृष्टतेसाठी भागीदार कंपन्यांना सन्मानित करतात.
- याचबरोबर PMIS च्या यशस्वी अंमलबजावणीस पाठिंबा देण्यासोबतच युवकांची रोजगारक्षमता मजबूत करण्यावर भर देतात.
इतर पुरस्कार :
- एचडीएफसी बँक लिमिटेड (HDFC Bank Limited) ला 'इंटर्नशिप-पूर्व उत्कृष्टता पुरस्कार (Pre-Internship Excellence Award)' मिळाला.
- श्रीराम फायनान्स लिमिटेडला 'इंटर्नशिप व्यवस्थापन उत्कृष्टता पुरस्कार (Internship Management Excellence Award)' मिळाला.