नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List)' २०२६ मध्ये गौतम अदानी अव्वल स्थानी असून मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि क्रिकेटपटूंच्या गटात शाहरुख खान आघाडीवर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • M3M इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने हुरुन इंडियामार्फत 'M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' जाहीर करण्यात आली आहे. 
  • सदर यादीत ९.२३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब प्रथम क्रमांकावर आहे. 
  • तर त्यापाठोपाठ मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब (८.६३ लाख कोटी रुपये) आणि एल.एन. मित्तल व त्यांचे कुटुंब (३.३९ लाख कोटी रुपये) यांचा क्रमांक लागतो.
  • मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि क्रिकेटपटू अशा ७ जणांचा सदर यादीत समावेश असून शाहरुख खान आणि त्यांचे कुटुंब १०,००० कोटी रुपये इतक्या संपत्तीसह आघाडीवर विराजमान आहे.

क्रमवारी आणि संपत्ती:

  • १. गौतम अदानी आणि कुटुंब (९.२३ लाख कोटी)
  • २. मुकेश अंबानी (८.६३ लाख कोटी रुपये)
  • ३. एल.एन. मित्तल  (३.३९ लाख कोटी)
  • ४. सायरस एस. पूनावाला आणि कुटुंब (३,०३,४०० कोटी)
  • ५. रोशनी नाडर मल्होत्रा (२,७८,५०० कोटी)

M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६ बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि कुटुंबांची माहिती देणारी ही एक वार्षिक क्रमवारी आहे.
  • यंदाची २०२६ ची यादी ही या उपक्रमाची १५ वी आवृत्ती आहे.