नुकतीच ल्यूक जे. लिंडबर्ग यांची 'जागतिक अन्न कार्यक्रमाच्या (World Food Programme - WFP)' कार्यकारी संचालक पदावर ५ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- अमेरिकन नागरिक आणि युनायटेड स्टेट्स कृषी विभागातील व्यापार आणि परदेशी कृषी व्यवहार विभागाचे उप-सचिव ल्यूक जे. लिंडबर्ग यांची 'जागतिक अन्न कार्यक्रमाचे (World Food Programme - WFP)' पुढील कार्यकारी संचालक (Executive Director) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- ५ वर्षांच्या कार्यकाळासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाच्या कार्यकारी संचालकांची नियुक्ती केली जाते.
- संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि अन्न व कृषी संघटनेचे महासंचालक क्यू डोंग्यू यांच्यामार्फत WFP कार्यकारी मंडळाशी चर्चा झाल्यानंतर संयुक्तपणे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- लिंडबर्ग हे यापूर्वी कार्यरत असणाऱ्या सिंडी मॅककेन यांची जागा घेतील.
- मॅककेन यांनी एप्रिल २०२३ ते मे २०२६ या काळात WFP च्या कार्यकारी संचालक पदावर काम केले आहे.
ल्यूक लिंडबर्ग यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ल्यूक जे. लिंडबर्ग हे २०२५ पासून युनायटेड स्टेट्स कृषी विभागामध्ये व्यापार आणि परदेशी कृषी व्यवहार विभागाचे 'उप-सचिव' म्हणून कार्यरत आहेत.
- २०२५ मध्ये USDA मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) उपक्रम - 'साउथ डकोटा ट्रेड'ची स्थापना केली आणि त्याचे नेतृत्व केले.
- साउथ डकोटातील निर्यातदारांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विस्तार करणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
- नोव्हेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२५ या काळात या संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले होते.