नुकताच अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा 'मेजर लीग सॉकर (Major League Soccer)' च्या इतिहासात सलग दोनदा 'एमएलएस गोल्डन बूट (MLS Golden Boot)' जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
ठळक मुद्दे:
- त्याने २०२६ च्या नियमित हंगामात 'इंटर मियामी सीएफ (Inter Miami CF)' क्लबसाठी लीगमध्ये सर्वाधिक २६ गोल केले आहेत.
- मेस्सीनंतर 'एफसी डॅलसचा (FC Dallas)' पेटार मुसा २२ गोलसह दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.
- त्यांनंतर 'नॅशव्हिल एससीचा (Nashville SC)' सॅम सरिज २१ गोलसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.
- मेस्सीने यापूर्वी उल्लेखनीय कामगिरी करताना २०२५ मध्ये २९ गोल करून 'एमएलएस गोल्डन बूट' जिंकला होता.
- यासह त्याने २०२४ आणि २०२५ मध्ये 'लँडन डोनोव्हन एमएलएस मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (Landon Donovan MLS Most Valuable Player)' हा पुरस्कारही पटकावला होता.