नुकतेच प्रख्यात गुजराती संगीतकार गौरंग व्यास यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- प्रख्यात गुजराती संगीतकार, संगीत संयोजक आणि गायक गौरंग व्यास हे चित्रपट, लोकसंगीत तसेच सुगम संगीतातील आपल्या विशेष योगदानासाठी ओळखले जात होते.
- त्यांचे अहमदाबाद, गुजरात येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.
- २४ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झाला होता.
गौरंग व्यास यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाची माहिती:
- 'जेसल तोरल' चित्रपटात वडील अविनाश व्यास यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रवासाची सुरुवात केली होती.
- 'लाखो फुलानी' या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून पदार्पण करत १०० हून अधिक चित्रपटांसाठी संगीत देण्याचे कार्य केले.
- 'भवनी भवाई', 'मनियारो', 'नसीबनी बलिहारी', 'पारकी थापण' आणि 'मायरमन मांडू नथी लागटू' यांचा त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये समावेश आहे.
प्राप्त पुरस्कार:
- 'जीवनगौरव पुरस्कार (२०२२)' - गुजरात सरकार
- 'गुजरात राज्य संगीत अकादमी' व 'गुजरात पर्यटन' विभागाकडून विशेष सन्मान (२०२४)