नुकतेच प्रसिद्ध अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या 'सौकार जानकी' यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- तमिळनाडू मधील चेन्नई येथे ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री संकरमंची जानकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे.
- त्या 'सौकार जानकी' या नावाने लोकप्रिय होत्या.
- आंध्र प्रदेशातील सध्याच्या राजमहेंद्री येथे १२ डिसेंबर १९३१ रोजी जानकी यांचा जन्म झाला होता.
- अष्टपैलू अभिनय आणि विविध भाषांमधील वैविध्यपूर्ण भूमिका साकारणे यांसाठी त्या ओळखल्या जात होत्या.
- भारत सरकारने २०२२ मध्ये त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल कला क्षेत्रातील 'पद्मश्री'(भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार) देऊन सन्मानित केले होते.
सौकार जानकी यांच्याबद्दल थोडक्यात महत्वपूर्ण माहिती:
- जानकी या भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत महत्त्वपूर्ण अभिनेत्रींपैकी एक होत्या.
- तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम व हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय योगदानासह त्यांची कारकीर्द ७ दशकांहून अधिक काळ चालली.
- वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी १९५० सालच्या 'शावकारू' या गाजलेल्या तेलगू चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले होते.
- याच चित्रपटामुळे त्यांना त्यांच्या नावासोबत 'सौकार' हे उपनाव मिळाले होते.
- त्यांनी आपल्या कारकिर्दीत ४०० हून अधिक चित्रपटांमध्ये आणि ३०० हून अधिक नाटकांमध्ये अभिनय केला होता.