नुकतीच ललित कला अकादमीतर्फे ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात २० पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या ललित कला अकादमीमार्फत (Lalit Kala Akademi - National Academy of Art) ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात (National Exhibition of Art - NEA) २० पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 
  • रवींद्र भवन, नवी दिल्ली येथे आयोजित सदर प्रदर्शनात देशभरातील जवळपास २५०० कलाकारांच्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले होते.
  • श्री. गजेंद्र सिंह शेखावत (केंद्रीय मंत्री, संस्कृती मंत्रालय) यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाबाबत महत्वपूर्ण माहिती:

  • यामध्ये २ स्तरीय निवड प्रक्रिया राबवण्यात आली.
  • पहिल्या स्तरावरील निवड समितीने २७० कलाकृतींची प्राथमिक निवड करण्यात आली तर तर दुसऱ्या स्तरावरील निवड समितीमार्फत २० कलाकृतींची अंतिम निवड करण्यात आली होती.

समाविष्ट श्रेण्या:

  • चित्रकला
  • शिल्पकला
  • रेखाटन
  • प्रिंटमेकिंग
  • मिश्र माध्यम

प्रमुख पुरस्कार विजेत्यांची यादी (नाव-कला):

  • गोपाल चंद्र नस्कर (चित्रकला)
  • चंद्र शेखर सैन (शिल्पकला)
  • प्रीतम मधुकर देउसकर (प्रिंटमेकिंग)
  • पंकज कुमार शर्मा (रेखाटन)