'समाजातील सर्वांसाठी आजीवन शिक्षणाची संकल्पना समजून घेणे' अर्थात 'उल्लास (Understanding of Lifelong Learning for All in Society - ULLAS)' अंतर्गत लक्षद्वीप हे भारतातील पहिले १००% साक्षर केंद्रशासित प्रदेश बनले आहे.

ठळक मुद्दे:

  • 'समाजातील सर्वांसाठी आजीवन शिक्षणाची संकल्पना समजून घेणे' अर्थात 'उल्लास (Understanding of Lifelong Learning for All in Society - ULLAS)' - नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत लक्षद्वीपला १००% साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  • पात्र ठरलेल्या सर्व शिकाऊ व्यक्तींनी 'मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यांकन चाचणी (Foundational Literacy and Numeracy Assessment Test)' यशस्वीपणे उत्तीर्ण केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
  • प्रफुल पटेल (प्रशासक, लक्षद्वीप) यांनी लक्षद्वीपमधील कवरत्ती येथे आयोजित एका कार्यक्रमात ही घोषणा केली.
  • 'ULLAS' योजनेअंतर्गत मे २०२५ मध्ये मिझोरामला भारतातील पहिले पूर्णपणे साक्षर राज्य म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले होते.