लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे नुकताच जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
ठळक मुद्दे:
- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- जम्मू-काश्मीरचे विद्यमान नायब राज्यपाल मनोज सिन्हा रजेवर असताना यांच्या अनुपस्थितीत जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांची कामे पाहण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
- प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे सुरू राहावे यासाठी सक्सेना हे लडाखसोबतच जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांची कामेही पाहतील.
- जम्मू-काश्मीरचे दुसरे नायब राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारलेले (७ ऑगस्ट २०२० रोजी) मनोज सिन्हा सध्या अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.
- जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांना सक्सेना हे पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.