ICICI बँकेत ९.९९% पर्यंत हिस्सा खरेदी करण्यासाठी नुकतीच 'भारतीय जीवन विमा महामंडळाला (Life Insurance Corporation of India - LIC)' भारतीय रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank of India - RBI) मंजुरी मिळाली आहे.

ठळक  मुद्दे:

  • खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या 'ICICI बँक लिमिटेड'मधील पेड-अप शेअर भांडवल किंवा मतदानाच्या अधिकारांपैकी ९.९९% पर्यंतचा एकूण हिस्सा खरेदी करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी सरकारी जीवन विमा कंपनी असलेल्या LIC ला RBI ची मंजुरी मिळाली आहे.
  • RBI च्या म्हणण्यानुसार, ही मंजुरी काही अटींच्या अधीन असून यामध्ये लागू असलेल्या वैधानिक आणि नियामक तरतुदींचे पालन करणे समाविष्ट आहे.
  • जर LIC ने १ वर्षाच्या कालावधीत मंजूर झालेला हिस्सा खरेदी केला नाही तर RBI ची मंजुरी रद्द मानली जाईल.

LIC बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात 'भारतीय जीवन विमा महामंडळ' होय.
  • स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र येथे LIC चे मुख्यालय स्थित आहे.
  • बोधवाक्य: 'योगक्षेमं वहाम्यहम्' म्हणजेच Your welfare is our responsibility अर्थात 'तुमचे कल्याण ही आमची जबाबदारी आहे' हे LIC चे बोधवाक्य आहे.

RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
  • स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
  • बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.