नुकतेच लडाखचे नायब राज्यपाल (Lieutenant Governor) विनय कुमार सक्सेना यांच्यामार्फत लडाखला भारताचा पहिला १००% 'सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश (Organic Union Territory)' म्हणून घोषित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- रासायनिकमुक्त शेतीला प्रोत्साहन देणे, हिमालयातील नाजूक परिसंस्थेचे रक्षण करणे तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे या सर्व प्रयत्नांना आलेले यश म्हणूनच लडाखला ही मान्यता मिळाली आहे.
- नायब राज्यपालांनी संपूर्ण केंद्रशासित प्रदेशात शेतीसाठी रासायनिक आणि कृत्रिम खतांची खरेदी, वितरण, विक्री, विपणन आणि वापरांवर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले होते.
- शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी सेंद्रिय शेतीकडे सहज संक्रमण व्हावे यासाठी विविध गावांमध्ये सेंद्रिय खतांचे वाटप करण्यात आले होते.
- सदर नवीन सेंद्रिय शेती धोरणामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या जर्दाळू,बार्ली या पिकांसाठी तसेच स्थानिक भाज्यांसाठी नवीन आर्थिक संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.