L&T मार्फत नुकतीच 'समर्थक (Samarthak)' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (Multi-Purpose Vessel - MPV) सुपूर्द करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- 'लार्सन अँड टुब्रो लिमिटेडद्वारे (Larsen & Toubro Ltd. - L&T)' तामिळनाडूमध्ये तयार करण्यात आलेली 'समर्थक' ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बहुउद्देशीय नौका (MPV) सुपूर्द करण्यात आली आहे.
- संरक्षण मंत्रालयाने २५ मार्च २०२२ रोजी L&T सोबत २ MPV च्या बांधकामासाठी ८८७ कोटी रुपयांचा करार केला आहे.
- 'समर्थक' हे नाव या नौकेची मुख्य भूमिका दर्शवते.
- विविध सागरी मोहिमा आणि उपक्रमांना आधार देण्यासाठी डिझाइन केलेले एक विश्वसनीय आणि बहु-भूमिका बजावणारे व्यासपीठ म्हणून ही नौका मोलाची भूमिका बजावणार आहे.
- या नौकेमध्ये 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेनुसार ७५% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांचा वापर करण्यात आला असून स्वदेशी नौदल शस्त्रे आणि सेन्सर्सच्या चाचणीसाठी एक उत्तम 'चाचणी आणि मूल्यमापन व्यासपीठ' म्हणून तिच्याकडे पाहण्यात येत आहे.