नुकतेच कोकणी भाषा कार्यकर्ते आणि पद्मश्री पुरस्कार विजेते एन. पुरुषोत्तम मल्ल्या यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, लेखक तसेच कोकणी भाषा कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध असणाऱ्या एन. पुरुषोत्तम मल्ल्या यांचे केरळमधील कोची येथे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले आहे.
- ७ मे १९२९ रोजी केरळमधील मट्टनचेरी येथे त्यांचा जन्म झाला होता.
- त्यांना २०१५ मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील सांस्कृतिक आणि भाषिक एकात्मतेसाठीच्या योगदानाबद्दल 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
एन. पुरुषोत्तम मल्ल्या यांच्याबाबत महत्वाची माहिती:
साहित्य रचना:
- 'शतक (१०० ओळींच्या कविता)' काव्यप्रकाराचे प्रणेता असणाऱ्या मल्ल्या यांनी वैविध्यपूर्ण साहित्यकृतींची रचना करून कोकणी साहित्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली आहे.
- २००८ मध्ये त्यांना 'साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (तिरुवल्लुवर यांच्या 'तिरुक्कुरल' या ग्रंथाचा कोकणी भाषेत अनुवाद - वर्ष २००२)' मिळाला होता.
कार्यकर्ते म्हणून अमूल्य योगदान:
- कोकणी भाषेचा भारतीय संविधानाच्या ८ व्या अनुसूचीमध्ये समावेश करून घेणे तसेच केरळमधील कोकणी भाषिकांना भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळवून देणे या कार्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
प्राप्त पुरस्कार (पुरस्कार नाव - देयक संस्था - वर्ष):
- 'विमला व्ही. पै विश्व कोकणी जीवन सिद्धी सन्मान' (जीवनगौरव पुरस्कार) - कर्नाटक, मंगळुरू येथील 'वर्ल्ड कोकणी सेंटर'मार्फत (२०११)
- 'माधव मंजुनाथ शानभाग कोकणी सेवा पुरस्कार' - गोवा कोकणी अकादमीतर्फे (कोकणी भाषेतील योगदानाबद्दल)
- 'साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार - २००२ साली तिरुवल्लुवर यांच्या 'तिरुक्कुरल' या ग्रंथाचा कोकणी भाषेतील अनुवादाबद्दल (२००८)