जानेवारी २०२७ मध्ये कोलकाता येथे 'इंडिया एनर्जी वीक (India Energy Week)'ची ५ वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे.
ठळक मुद्दे:
- हरदीप सिंग पुरी (केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री) आणि सुवेंदू अधिकारी (मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल) यांच्यामार्फत ही घोषणा करण्यात आली आहे.
- 'इंडिया एनर्जी वीक (India Energy Week)' २०२७ च्या ५ व्या आवृत्तीसाठी कोलकाता, पश्चिम बंगाल हे यजमान शहर म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.
- संकल्पना / थीम (Theme): 'नाविन्याला चालना. ऊर्जा सुरक्षा. उद्याची जडणघडण (Unlocking Innovation. Securing Energy. Shaping Tomorrow.)' ही या परिषदेची संकल्पना आहे.
- २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत कोलकाता येथे IEW २०२७ ही परिषद आयोजित केली जाणार आहे.