'किश्त (Kissht )'मार्फत नुकतीच सचिन तेंडुलकरला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घेऊन ‘कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज (Loans Without Any Hiccups)’ या नवीन ब्रँड मोहीमेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India- RBI) मध्ये नोंदणीकृत बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Financial Company - NBFC) 'किश्त'मार्फत नुकतीच भारतीय क्रिकेटमधील दिग्गज भारतरत्न सचिन तेंडुलकरला घेऊन ‘कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्ज (Loans Without Any Hiccups)’ ही आपली नवीन ब्रँड मोहीम सुरू केली.
- जलद, सोप्या आणि कागदविरहित डिजिटल कर्जपुरवठ्यावर प्रकाश टाकून किश्तच्या ब्रँडची ओळख वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
'किश्त (Kissht)' डिजिटल कर्जपुरवठा मोहिमेबद्दल थोडक्यात माहिती:
- सदर मोहिमेत 'किश्त' ॲपच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरला अधोरेखित करत जलद आणि सोप्या डिजिटल कर्ज मंजुरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
- जलद कर्ज मंजुरी, कागदविरहित अर्ज, वापरकर्त्यासाठी अनुकूल मोबाइल ॲपचा अनुभव तसेच कमीत कमी अडथळ्यांसह एक सुरळीत कर्जप्रक्रिया ही मोहीम दर्शवते.
- 'किश्त' ही २०१५ मध्ये स्थापित महाराष्ट्रातील मुंबई येथे मुख्यालय असलेली आणि एकाच ॲप मॉडेलद्वारे वैयक्तिक, व्यावसायिक आणि डिजिटल मालमत्ता कर्जे प्रदान करण्याचे कार्य करते.
RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
- स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
- बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
- सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.