नुकताच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (National Commission for Scheduled Castes - NCSC) अध्यक्ष किशोर मकवाना यांना 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार (Dr. APJ Abdul Kalam Jan Seva Puraskar) २०२६' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे:

  • किशोर मकवाना यांना आयोगाची समर्पित सेवा तसेच सामाजिक न्यायासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • नवी दिल्ली येथे आयोजित १६ व्या 'संसद रत्न पुरस्कार २०२६' सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जनसेवा पुरस्कार - महत्वाचे मुद्दे:

पुरस्काराचा उद्देश:

  • ज्यांनी जनसेवा आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. 
  • अनुसूचित जातींसाठी समानता, प्रतिष्ठा आणि घटनात्मक संरक्षणाला चालना देण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनादेखील हा पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्कार निवड प्रक्रिया:

  • सदर पुरस्कारासाठी NCSC ची शिफारस 'प्राइम पॉइंट फाउंडेशन (Prime Point Foundation)'ने केली होती आणि आयोगाच्या प्रभावी कार्यामुळे 'संसद रत्न पुरस्कार समिती'च्या ज्युरीने त्यांची निवड केली.

NCSC बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): NCSC म्हणजेच National Commission for Scheduled Castes अर्थात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग होय.
  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे NCSC चे मुख्यालय स्थित आहे.
  • स्थापना तरतूद: १९ फेब्रुवारी २००४ रोजी (८९ व्या घटनादुरुस्ती कायदा, २००३ अन्वये पूर्वीच्या आयोगाचे विभाजन झाल्यानंतर, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अंतर्गत) NCSC ची स्थापना करण्यात आली होती.