नुकतेच 'कीर्ती चक्र' विजेते मेजर जनरल सुनील कुमार राजदान यांचे निधन झाले आहे.

ठळक मुद्दे:

  • नवी दिल्ली येथे भारतीय लष्कराचे (Indian Army - IA) पहिले व्हीलचेअर-वापरकर्ते जनरल आणि कीर्ती चक्र व विशिष्ट सेवा पदकविजेते मेजर जनरल सुनील कुमार राजदान (निवृत्त) यांचे नुकतेच निधन झाले आहे.
  • ते ७० वर्षांचे होते.
  • मेघालयातील शिलाँग (तत्कालीन हॅपी व्हॅली) येथे ८ ऑक्टोबर १९५४ रोजी राजदान यांचा जन्म झाला होता.

मेजर जनरल सुनील कुमार राजदान यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाचे:

  • ते भारतीय लष्कराचे एक अत्यंत प्रतिष्ठित अधिकारी होते आणि ते आपल्या उत्कृष्ट लष्करी सेवा आणि जिद्दीसाठी ओळखले जात असत.
  • विशेष दल असणाऱ्या पॅराशूट रेजिमेंटच्या ७ व्या बटालियनचे सदस्य असताना, तत्कालीन लेफ्टनंट कर्नल राजदान यांनी १९९४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैबाच्या दहशतवाद्यांविरुद्धच्या एका मोहिमेचे नेतृत्व केले होते.
  • गंभीर दुखापत होऊनही ते सर्व आव्हानांवर मात करत भारतीय लष्कराचे पहिले व्हीलचेअर-वापरकर्ते जनरल बनले.
  • राजदान यांना त्यांच्या मोहिमांदरम्यान दाखवलेल्या असाधारण धैर्य आणि त्याग यासाठी भारताचा शांतता काळातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'कीर्ती चक्र' आणि 'विशिष्ट सेवा पदक' देऊन सन्मानित करण्यात आले होते.