कर्नाटक बँकेमार्फत उदय कुमार हेब्बार यांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (Managing Director and Chief Executive Officer - MD & CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- कर्नाटक, मंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या खाजगी क्षेत्रातील 'कर्नाटक बँक लिमिटेड' तर्फे उदय कुमार हेब्बार यांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी MD & CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- ते बिजी श्रीकृष्णाविलास शंकरनारायणन यांची जागा घेतील.
उदय कुमार हेब्बार यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- त्यांना यांना बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
- त्यांना कॉर्पोरेशन बँकेत १०+ वर्षे, ICICI बँकेत ११+ वर्षे आणि बार्कलेज बँकेत ३ वर्षे वरिष्ठ पदांवर काम करण्याचा अनुभव आहे.
- सप्टेंबर २०१० ते जून २०१५ या काळात त्यांनी CEO म्हणून आणि जून २०१५ ते जून २०२५ या काळात MD & CEO म्हणून काम केले आहे.