नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'कांतार ब्रँडझेड (Kantar BrandZ) अहवाल' २०२६ नुसार Airtel ने HDFC बँकेला मागे टाकून भारताचा सर्वाधिक मौल्यवान ब्रँड होण्याचा मान मिळवला आहे.
ठळक मुद्दे:
- 'कांतार ग्रुप (Kantar Group)' ही मार्केटिंग डेटा आणि ॲनालिटिक्स क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी आहे.
- तिने नुकताच 'कांतार ब्रँडझेड टॉप १०० मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स (Kantar BrandZ’s Top 100 Most Valuable Indian Brands) २०२६' हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
- सदर अहवालानुसार भारती एअरटेल (Airtel) भारताचा सर्वाधिक मौल्यवान ब्रँड ठरला आहे.
अद्ययावत क्रमवारी:
- १. भारती एअरटेल (Airtel)
- २. HDFC बँक
- ३. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)
- ४.स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)