नुकतीच कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची 'भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (Securities and Exchange Board of India - SEBI)' पूर्णवेळ सदस्य पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीमार्फत (Appointments Committee of the Cabinet - ACC) 'भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (Securities and Exchange Board of India - SEBI)' पूर्णवेळ सदस्य म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
कमलेश चंद्र वार्ष्णेय यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ते १९९० च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (आयकर) अधिकारी होते.
- यापूर्वी त्यांनी वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागामध्ये 'कर धोरण आणि कायदे' विभागाचे सहसचिव म्हणून काम केले आहे.
- बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभाग, कायदेशीर व्यवहार विभाग, एकात्मिक देखरेख विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग इत्यादी विभाग त्यांनी सांभाळलेले होते.
- वार्ष्णेय यांनी २०२३ मध्ये सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता आणि आता १९ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
- भारतीय कर धोरण आणि 'विवाद से विश्वास' योजनेतील योगदानाबद्दल त्यांना 'वित्तमंत्री पुरस्कार' मिळाला आहे.
SEBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full Form): SEBI म्हणजेच Securities and Exchange Board of India अर्थात 'भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ' होय.
- स्थापना वर्ष: १२ एप्रिल १९८८ रोजी एक बिगर-वैधानिक संस्था म्हणून स्थापना.
- वैधानिक दर्जा प्राप्त वर्ष: ३० जानेवारी १९९२ रोजी 'सेबी कायदा, १९९२' अंतर्गत सेबीला वैधानिक अधिकार प्रदान करण्यात आले.
- मुख्यालयाचे ठिकाण: SEBI चे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे.
- सध्या कार्यरत अध्यक्ष: तुहिन कांत पांडे हे सध्या SEBI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.