नुकतेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते नवी दिल्लीत 'तिसऱ्या आंतरराष्ट्रीय भारत 6G परिसंवाद (International Bharat 6G Symposium) २०२६' चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- ज्योतिरादित्य एम. सिंधिया (केंद्रीय मंत्री, संपर्क मंत्रालय आणि ईशान्येकडील प्रदेश विकास मंत्रालय) यांनी 'इंडिया मोबाईल काँग्रेस (India Mobile Congress - IMC) २०२६' च्या निमित्ताने नवी दिल्लीतील द्वारका येथील 'यशोभूमी' येथे 'तिसऱ्या आंतरराष्ट्रीय भारत 6G परिसंवाद २०२६' चे उद्घाटन केले आहे.
- हा संवाद ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडला आहे.
- पुढील पिढीतील दळणवळण तंत्रज्ञान आणि भारताची 6G (सहावी पिढी) क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे यांना चालना देणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश होता.
- B6GA ने ५ संस्थांशी सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली आहे.