नुकतीच न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि एम. सी. त्रिपाठी यांची कलकत्ता व मुंबई उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश म्हणून शिफारस करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची अनुक्रमे कलकत्ता उच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे.
- सदर शिफारस ६ ऑगस्ट रोजीच्या कॉलेजियमच्या ठरावाद्वारे करण्यात आली आहे.
- न्यायमूर्ती घुगे हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
- एम. सी. त्रिपाठी हे सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार पाहतील.