नुकतेच केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यामार्फत नवी दिल्ली येथे महासागर संवर्धनासाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर (Swachh Sagar, Surakshit Sagar) २०२६’ च्या ५ व्या आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • डॉ. जितेंद्र सिंह यांनी नवी दिल्ली येथे ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६’ (SSSS v5.0) च्या ५ व्या आवृत्तीचा शुभारंभ केला. 
  • १२ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही महासागर संवर्धन मोहीम सुरू करण्यात आली होती.
  • १७ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिना’च्या दिवशी मोहिमेचा समारोप झाला.
  • सागरी प्रदूषण, किनारा स्वच्छता आणि महासागराच्या संसाधनांचा शाश्वत वापर यांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच यात विद्यार्थी व तरुणांचा सहभाग वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर २०२६’ बद्दल इतर महत्वाच्या बाबी:

  • यावेळी ‘सागर प्रहरी’ (SAGAR PRAHARI)' मोबाईल ॲप्लिकेशनसह इतर डिजिटल सहभाग व्यासपीठांचे अनावरण करण्यात आले.
  • SSSS v5.0 अंतर्गत पहिल्यांदाच 'https://www.oceanolympiad.com/‘ या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून 'राष्ट्रीय महासागर ऑलिम्पियाड (National Ocean Olympiad)' सुरू करण्यात आले आहे.
  • सदर मोहीम दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या ‘आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनाच्या' आठवड्यात राबवली जाते.