झारखंडच्या ‘मंदार’ या पारंपरिक लोक-वाद्याला त्याची विशिष्ट भौगोलिक आणि सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारे ‘भौगोलिक मानांकन (GI Tag)' प्रदान करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालय (Geographical Indications Registry), चेन्नईमार्फत झारखंडच्या ‘मंदार’ या पारंपरिक लोक-वाद्याला ‘भौगोलिक मानांकन’ (GI Tag) प्रदान करण्यात आले आहे.
‘मंदार’बाबत महत्वपूर्ण माहिती:
- २०२५ मध्ये दिल्ली येथे झालेल्या सुनावणीनंतर ‘मंदार’ची विशिष्ट रचना, निर्मितीची पारंपरिक पद्धत, ध्वनीविषयक गुणधर्म तसेच झारखंडशी असणाऱ्या दृढ सांस्कृतिक संबंधाच्या आधारावर हे मानांकन देण्यात आले आहे.
- झारखंडच्या आदिवासी आणि लोकसंस्कृतीचा मंदार हा अविभाज्य भाग आहे.
- स्थानिक लाल माती, प्राण्यांची कातडी तसेच स्थानिक तंत्रांचा वापर करून हे वाद्य पारंपरिक पद्धतीने बनवले जाते.
- यामुळे त्याला एक अद्वितीय ध्वनी तसेच ओळख प्राप्त होते.