नुकतीच निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'चे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer - CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- अयोध्या, उत्तर प्रदेश येथील श्री राम मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'च्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- अंतरिम सरचिटणीस कृष्ण मोहन यांच्या जागी माजी खजिनदार गोविंद देव गिरी यांची सरचिटणीस म्हणून तसेच महेश भागचंदका यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- जवळपास ५ ते ६ हजार अर्जांच्या छाननीनंतर अंतिम ३ उमेदवारांमधून (इतर अंतिम उमेदवार मेजर जनरल संजय प्रताप सिंग बिश्त आणि श्रुती भारद्वाज) जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली.
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान जितेंद्र मिश्रा यांनी वेस्टर्न एअर कमांडचे नेतृत्व केले होते.
- ते भारतीय हवाई दलातून ते एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त झाले होते.