जयंती प्रसाद यांनी नुकताच 'भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाचे (Insolvency and Bankruptcy Board of India - IBBI)' अध्यक्ष म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.
ठळक मुद्दे:
- IBBI चे पूर्ण-वेळ सदस्य जयंती प्रसाद यांनी नुकताच १३ सप्टेंबर २०२६ पासून IBBI च्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
- ते रवी मित्तल यांची जागा घेतील.
- जयंती प्रसाद हे २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत हा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.
जयंती प्रसाद यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- ते १९८६ च्या बॅचचे 'भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा सेवा (Indian Audit and Accounts Service - IA&AS)' अधिकारी आहेत.
- त्यांना जवळपास ३९ वर्षांचा नागरी सेवेचा अनुभव आहे.
- ५ जुलै २०२२ रोजी ते IBBI मध्ये पूर्ण-वेळ सदस्य म्हणून रुजू झाले होते.
- भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General of India - CAG) कार्यालयात त्यांनी 'डेप्युटी CAG' सह विविध वरिष्ठ पदे भूषवली आहेत.
- संयुक्त राष्ट्रांच्या सोमालिया, केनिया आणि न्यूयॉर्क येथील कार्यक्रमांमध्ये जवळपास ६ वर्षे 'मुख्य लेखापरीक्षक' म्हणून त्यांनी काम केले आहे.
- यासोबतच 'ऑइल फॉर फूड प्रोग्राम'मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
IBBI बाबत महत्वपूर्ण माहिती:
- पूर्ण नाव (Full-form): IBBI म्हणजेच Insolvency and Bankruptcy Board of India अर्थात भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळ होय.
- स्थापना वर्ष: IBBI ही 'दिवाळखोरी आणि नादारी संहिता (Insolvency and Bankruptcy Code - IBC)', २०१६ अंतर्गत १ ऑक्टोबर २०१६ रोजी स्थापन झाली होती.
- मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे IBBI चे मुख्यालय स्थित आहे.
- नियामक संस्थेचे सध्या कार्यरत प्रमुख/ अध्यक्ष: सध्या रवी मित्तल हे IBBI च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.
- वैशिष्ट्य: ही एक वैधानिक नियामक संस्था आहे.
- महत्वपूर्ण कार्य: ही संस्था नादारी आणि दिवाळखोरी व्यावसायिक, दिवाळखोरी व्यावसायिक संस्था तसेच माहिती सुविधांवर देखरेख ठेवण्याचे कार्य करते.