नुकतीच जय शाह यांची 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council - ICC)' अध्यक्षपदी दुसऱ्या कार्यकाळासाठी बिनविरोध पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • ICC मार्फत जय शाह यांची अध्यक्षपदी दुसऱ्या २ वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध पुनर्नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • यापूर्वी त्यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी ग्रेग बार्कले यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.
  • इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या ICC बोर्डाच्या बैठकीत या पुनर्नियुक्तीला मंजुरी देण्यात आली आहे.
  • सदर पुनर्नियुक्तीमुळे जागतिक क्रिकेटच्या विस्तार तसेच विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर मुख्य नेतृत्वात सातत्य राखले जाणार आहे ही जमेची बाजू म्हणता येईल.

ICC बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): ICC म्हणजेच 'International Cricket Council' अर्थात 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद' होय.
  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी लंडन येथे ICC ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: २००५ पासून दुबई, संयुक्त अरब अमिराती (पूर्वी १९०९ ते २००५ दरम्यान लंडन) येथे ICC चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या ICC चे १११ सदस्य देश आहेत.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या जय शाह हे ICC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.