नुकतीच जपानच्या युको केइचो यांची जागतिक बँक समूहाच्या (World Bank Group - WBC) उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक (Vice President & Auditor General) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • जागतिक बँक समूहातर्फे जपानी नागरिक युको केइचो यांची उपाध्यक्ष आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संस्थेची प्रशासन आणि अंतर्गत लेखापरीक्षण प्रणाली सदर निर्णयामुळे अधिक बळकट झाली आहे.
  • 'अंतर्गत लेखापरीक्षण उपाध्यक्ष कार्यालय' (IAD) चे नेतृत्व तसेच जागतिक बँक समूहाच्या विविध संस्थांमधील प्रशासन, जोखीम व्यवस्थापन व कामकाजातील सचोटी यांवर त्या देखरेख ठेवण्याचे कार्य करतील.

युको केइचो यांच्याबद्दल थोडक्यात महत्वाचे:

  • बहुपक्षीय संस्था आणि खाजगी क्षेत्रात त्यांना ३० वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे.
  • त्यांनी यापूर्वी 'आशियाई विकास बँके'त (ADB) महालेखापरीक्षक म्हणून तसेच जागतिक बँक समूहातही वरिष्ठ पदे भूषवली आहेत
  • जागतिक बँक समूहातील त्यांची ही नियुक्ती विशेष आहे कारण यापूर्वी त्यांनी येथे २ दशकांहून अधिक काळ सेवा बजावली आहे.
  • त्या आता थेट अजय बंगा यांना अहवाल सादर करतील.

जागतिक बँक समूहाबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • स्थापना वर्ष: १९४४ मध्ये जागतिक बँक समूहाची स्थापना करण्यात आली आहे.
  • मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डी.सी. (अमेरिका) येथे चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत अध्यक्ष: सध्या अजय बंगा हे जागतिक बँक समूहाच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.