नुकतीच जपानमार्फत मंगळाचा चंद्र 'फोबोस (Phobos)' येथून नमुने गोळा करण्यासाठी 'मंगळाच्या चंद्रांचे अन्वेषण (Martian Moons eXploration - MMX) मोहीम' राबविण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीमार्फत (Japan Aerospace Exploration Agency - JAXA) MMX मोहिमेचा भाग असलेले मानवरहित अंतराळयान जपानमधील तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लाँच कॉम्प्लेक्सवरून H3 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे.
- मंगळाचा चंद्र 'फोबोस' येथून नमुने गोळा करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
- जर ही मोहीम यशस्वी झाली तर मंगळाच्या चंद्रावरून नमुने पृथ्वीवर परत आणणारी आणि वैज्ञानिक विश्लेषणासाठी उपलब्ध करून देणारी 'MMX' ही जगातील पहिली मोहीम ठरणार आहे.