नुकतीच केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यामार्फत हिमाचल प्रदेशातील केलॉन्ग येथे 'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (Indian Council of Medical Research - ICMR)' पहिल्या 'उंच पर्वतीय क्षेत्रातील वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्राची (High Altitude Medicine and Public Health Research Centre)' पायाभरणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • उंच पर्वतीय क्षेत्रातील आरोग्याशी संबंधित आव्हानांवर संशोधन करणे तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करणे हा या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे.
  • या केंद्रात प्रामुख्याने उंचावरील वातावरणाशी संबंधित आरोग्य धोके, शरीराचे वातावरणाशी जुळवून घेणे, माता व नवजात बालकांचे आरोग्य तसेच हिमालयीन समुदायांमध्ये आढळणारे आजारांचे स्वरूप या विषयांवर संशोधन करण्यात येईल.
  • टेलिमेडिसिन, ड्रोनद्वारे आरोग्य सेवा पुरवठा आणि डिजिटल आरोग्य प्रणाली यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दुर्गम भागांत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी हे केंद्र करेल.