नुकतेच इटालियन फुटबॉलचे दिग्गज, इंटर मिलानचे माजी कर्णधार आणि इटलीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू सँड्रो माझोला यांचे दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे:
- ते ८३ वर्षांचे होते.
- ८ नोव्हेंबर १९४२ रोजी इटलीमधील ट्युरिन येथे त्यांचा जन्म झाला होता.
सँड्रो माझोला यांच्याबाबत महत्वपूर्ण माहिती:
- १९६०-१९७७ या कालावधीत माझोला यांनी आपली १७ वर्षांची कारकीर्द इंटर मिलान सोबत घालवली होती.
- त्यांनी या काळात ५६५ सामन्यांत १६१ गोल करतानाच ४ 'सेरी ए' (इटलीची सर्वोच्च फुटबॉल लीग) विजेतेपदे व २ युरोपियन कप जिंकले होते.
- १९७१ च्या 'बॅलन डी'ओर' पुरस्कारासाठी दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होते.
- ते १९६४-६५ च्या हंगामात 'सेरी ए' मधील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले होते.