भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांना इस्रायलमार्फत 'राष्ट्राध्यक्ष नागरी शौर्य पुरस्कार' (Presidential Award for Civilian Heroism) या त्यांच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने (Highest Civilian Bravery Award) सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे:

  • 'फ्लायदुबई (Flydubai)' कंपनीचे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल असे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांनी जाहीर केले आहे.
  • विमानात घडू शकणारी एक मोठी दुर्घटना टाळल्याबद्दल त्यांना हा इस्रायलचा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
  • अत्यंत धैर्याने कॅप्टन मच्छार यांनी त्यांच्या सह-वैमानिकाचा हल्ला परतवून लावला होता.
  • कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेल्या प्रासंगिक धैर्यामुळे विमानात असणाऱ्या १७४ प्रवासी आणि कर्मचारी सदस्यांचे प्राण वाचले.

पुरस्काराबद्दल माहिती:

  • ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झॉग यांनी या 'राष्ट्राध्यक्ष नागरी शौर्य पुरस्काराची' सुरुवात केली होती.
  • स्वतःच्या जीवाची बाजी लावत इतरांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
  • एका भारतीय नागरिकाला हा पुरस्कार मिळणे ही खरोखरच एक दुर्मिळ आंतरराष्ट्रीय सन्मानाची बाब ठरली आहे.

सर्व पुरस्कार विजेत्यांची यादी:

  • स्मित मच्छार
  • ताली मानेस
  • झ्विका मानेस
  • यानीव्ह हायून
  • शोता मुसायेव
  • असाफ राजुआन
  • ओर पार्दिलोव्ह