भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव 'युद्ध अभ्यास २०२६' नुकताच भारतात राजस्थान आणि उत्तराखंड येथे सुरू झाला आहे.

ठळक मुद्दे:

  • या वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव असलेल्या 'युद्ध अभ्यास २०२६' ची यंदाची ही २२ वी आवृत्ती बिकानेर (राजस्थान) आणि औली (उत्तराखंड) येथे सुरू झालीआहे.
  • हा सराव ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालणार आहे.
  • हा सराव मुख्यत्वे परस्पर कार्यक्षमता, कार्यान्वित सज्जता तसेच युद्धभूमीवरील उदयोन्मुख तंत्रज्ञानाबाबत सहकार्य वाढवण्यावर भर देणे या उद्देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे.

'युद्ध अभ्यास २०२६' सरावाबद्दल माहिती:

  • २०२५ मध्ये भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव 'युद्ध अभ्यास २०२५' ची २१ वी आवृत्ती फोर्ट वेनराईट, अलास्का, अमेरिका येथे आयोजित करण्यात आली होती.
  • 'ऑपरेशन पाथवेज' या आराखड्यांतर्गत हा सराव आयोजित केला जातो.
  • भारतीय आणि अमेरिकन लष्कर यांच्यातील परस्पर कार्यक्षमता, माहिती देवाणघेवाण तसेच सज्जता वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे.