नुकतीच भारताची २ वेळची ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिची २०२६-२०३० या कालावधीसाठी 'आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या (International Shooting Sport Federation - ISSF)' ॲथलीट्स कमिटीमध्ये निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • इजिप्तमधील कैरो येथे आयोजित 'ISSF' वर्ल्ड चॅम्पियनशिप (३०० मीटर रायफल) आणि कतारमधील दोहा येथे आयोजित 'ISSF' वर्ल्ड चॅम्पियनशिप (रायफल/पिस्तूल/शॉटगन) दरम्यान झालेल्या ऑनलाइन मतदानाद्वारे २ वेळची ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिची ISSF ॲथलीट्स कमिटीवर निवड करण्यात आली आहे.
  • मनू भाकर हिची पिस्तूल प्रकारातून निवड झाली आहे. तिच्यासोबत जर्मनीच्या ख्रिश्चन रिट्झ (Christian Reitz) यांचीही निवड झाली आहे. अशा प्रकारे, रायफल, पिस्तूल आणि शॉटगन या तिन्ही शूटिंग प्रकारांतून प्रत्येकी दोन प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे.

मनू भाकर बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • २०२४ - पॅरिस ऑलिम्पिक,फ्रान्स महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल आणि १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात २ कांस्यपदके
  •  २०१८ - वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी 'ISSF' वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय खेळाडू

प्राप्त पुरस्कार/ सन्मान:

  • अर्जुन पुरस्कार - २०२०
  • मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार - २०२४